Past Events

Ganpati 2024

Congratulations to all the winners!

CTMM Spring 5K Walk/Run
Thank you for the enthusiastic response to CTMM 5K! The weather was perfect and energy was outstanding. Congratulations to the winners in all categories!!

CTMM – Charchaughi

Thank you for the tremendous response to Charchaughi!
चारचौघी या नाटकाला तुम्ही दिलेल्या उत्स्फूर्त पाठिंब्याबद्दल आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद! आमच्या कार्यकारिणीसाठी हि भविष्यात असे अनेकोत्तम कार्यक्रम आयोजित करण्याची खात्री देणारी पावती आहे!!
CTMM - Charchaughi ticket booking

CTMM Gudhi Padwa March 30th

CTMM Sankrant – Jan 27th


CTMM Diwali

CTMM Diwali 2022

CTMM Ganapati

तुम्हा सर्वांचे कौतुकाचे मेसेजेस वाचून आम्ही EC मेंबर्स खरोखर भारावून गेलो आहोत. 🙏

ह्या वर्षीचा प्रत्येक कार्यक्रम तुमच्या उत्साहामुळे, सहभागामुळे आणि सहकार्यामुळे एक वेगळीच उंची गाठत आहे.

आपल्या नादब्रह्म पथकाची ढोल ताशा मिरवणूक , सुधीर काकांनी केलेली बाप्पांची पूजा , सुगरणीच्या हातचे ढेकर येईपर्यंत चे सुग्रास जेवण .. वाह!! किती सुंदर सुरवात झाली कार्यक्रमाची 👍👍

गौतम तुमची आठवण आल्याशिवाय CTMM चा कोणताही कार्यक्रम होणे शक्य नाही 🙏

बाप्पाच्या गाण्याने आणि नृत्याने आपल्या मराठी शाळेतील बालकलाकारांनी सादरीकरण केले ..
त्यांचे कौतुक तर शब्दात करूच शकत नाही. त्यांना शाबासकीची थाप तुम्ही सर्वानी उभे राहून टाळ्या वाजवून दिली🙏🙏 खऱ्या कौतुकाचे मानकरी आहेत त्यांच्या डान्स टीचर्स प्रिया, गौरी आणि निशा. ६ ते १४ वर्ष वयोगटातील ४० मुलांकडून इतका सुंदर डान्स करवून घेणे म्हणजे केवढे अवघड काम आहे हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे. ⁨अनुप्रिया ने तिच्या सिंगिंग क्लास मधील मुलांकडून अगदी रेकॉर्डेड वाटेल इतके सुंदर गाणे बसवून घेतले. खूपच कौतुकास्पद!!!

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते एकांकिका. आशय आणि आसावरी चे दिग्दर्शन, मार्गदर्शन, नेपथ्य, पार्श्वसंगीत, निवेदन, सादरीकरण आणि कलाकारांचे दमदार अभिनय.. सगळेच अप्रतिम होते. थिएटर मध्ये प्रायोगिक नाटक बघितल्याचा फील आला.

या वेळेस गौरव पुरस्काराची मानकरी ठरली सारा गिराच. तिची स्केटिंग मधील नेत्रदीपक कामगिरी आणि मेहनत वाखाणण्याजोगी आहे . सगळ्या मुलांसाठी ती नक्कीच एक प्रेरणास्थान आहे.

कल्याणी आणि पूजा यांच्या डान्स वर तर शिट्ट्या, टाळ्या आणि पाय थिरकले.

या वर्षी प्रथमच झालेल्या क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण ही पार पडले. विजेत्या संघांचे आणि वैयक्तिक पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन. तसेच पंच महादू व इतर सहाय्यक यांना धन्यवाद.

ज्या सर्वानी आम्हाला या पूर्ण कार्यक्रमात इतकी मदत केली त्या सर्व volunteers चे आणि मेहनतीने एवढे सुग्रास जेवण बनवणाऱ्या सुगरणींचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. 🙏

CTMM दिवाळी कार्यक्रमाची तारीख आणि रूपरेषा लवकरच कळवली जाईल 🙏

आपले प्रेम, पाठिंबा आणि सहभाग असाच कायम राहु द्यावा जेणेकरून आपण CTMM चा प्रत्येक कार्यक्रम अविस्मरणीय करून दाखवू शकतो.

🙏 CTMM कार्यकारिणी

CTMM Cricket
Connecticut Premier League
Sep 16th, 2023

Winners **

CTMM 5K 2023 – Saturday May 13th, 2023

CTMM GudhiPadwa 2023 – Sunday March 26th, 2023

नमस्कार मंडळी,  CTMM गुढीपाडवा कार्यक्रमात आपल्या सहभागाबद्दल मंडळ आभारी आपले आहे. असेच कार्यक्रम वरचेवर आयोजित करण्याचा आमचा मनसुबा आहे. आपला उत्साह ओसांडून वहात आहे. जे लोक काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही, त्यांनी अवश्या हा आढावाप्रत व्हिडीयो पहा…….

लवकरच भेटू.                                               

CTMM कार्यकारी समिती

CTMM Marathi Shala (Kids Play)

महाराष्ट्रातील संतांचा महिमा – महाराष्ट्राला संतांचा खूप मोठा वारसा लाभला आहे . यावर्षी CTMM ने गुढीपाडव्याला  महाराष्टलोकधारा कार्यक्रम करण्याचे ठरवले . मराठी शाळेतील मुलांना संधी द्यावी असा CTMM चे प्रेसिडेंट श्री श्री श्री मुकुंदराव देविदास आवटी यांनी त्यांच्या committee ला सांगितले . मग काय नाटकातले तज्ञ गौतम नाईक यांनी मला व हेमंत कडेगावकर यांना संतांचा महिमा संकल्पना करू असे सुचवले . मी , गौतम आणि हेमंत यांनी नाटक लिहून शाळेच्या टीचर दीपम आणि नुपूर यांना ऐकवले. त्यांनीही खूप छान साथ दिली . अगदी मुलांच्या selection पासून ते प्रॉप्स बनवण्या पर्यंत . त्यांना खूप धन्यवाद.

आम्ही जसा विचार केला होता त्याहीपेक्षा मुलांनी ते स्टेज वर चांगले सादरीकरण केले . या सगळ्या मध्ये सर्वात जास्त कौतुकाचे मानकरी आहेत ते शाळेतील मुले. त्यांच्यासाठी आमच्याकडे शब्दच नाहीत. अमेरिकेमध्ये राहून मराठीत शुद्ध उच्चार आणि त्यांचा स्टेज वरचा वावर यासाठी त्यांना मानाचा मुजरा. ज्ञानेश्वर, सोपानदेव , निवृत्ती महाराज, मुक्ताई , श्री व सौ गृहस्थ , गोरा कुंभार , तुलसी , तुकाराम महाराज , दिंडीतले सगळे वारकरी आणि संतांचे आदरस्थान विठ्ठल या सगळ्या पात्रांची acting करणारे आमचे चिमुकले बालकलाकारांचे खूप खूप कौतुक

नाटकामध्ये आम्हाला सर्वात मोठी साथ मिळाली ती पालकांची. प्रॉप्स बनवण्या पासून ते मुलांचे costume करण्यापर्यंत सर्व जबाबदारी त्यांनी अतिशय उत्तम सांभाळली . त्यांनाही खूप धन्यवाद

नाटकाचे निवेदन सौ. मीनल अवचट यांनी अतिशय सुंदर केले. त्यांचे खूप आभार.

संतांचा महिमा हे बालकलाकारांचे नाटक मंत्रमुग्ध होऊन , टाळ्यांच्या कडकडाटाने प्रतीसाद देण्याऱ्या सर्व विठ्ठल भक्तांचे CTMM मनापासून आभार मानते.

येथील मुलांना आपल्या संत परंपरेचा महिमा कळावा हा ऊद्देश पूर्ण झाला😊🙏

CTMM Sankrant 2023 – Saturday, Jan 28th, 2023


CTMM Diwali 2022 – Nov 19, 2022


CTMM Ganeshotsav 2022 – Saturday September 17th 2022

Ganeshotsav 2022

CTMM Gudi Padwa 2022 – Sunday April 3rd 2022

CTMM Gudi Padwa 2022

Pawankhind – Movie Screening – Saturday March 12th 2022

Pawankhind

CTMM Sankrant – 2022 – Sunday January 30th

CTMM Sankrant 2022

CTMM Sankrant 2022

CTMM Diwali 2021 – Saturday November 20th  

CTMM Diwali 2021

CTMM Diwali 2021

CTMM Ganeshotsav 2021 – Sunday September 26th 

Gudi Padwa 2021  – Saturday April 17th

Our super talented prize winners from the Gudi Padwa program –* CTMMs Got Talent *
Judges awards (Solo Performances)
1 – Riya Pendse (Prize from Sponsor Spardha)
2 – Swara Kayande (Prize from Sponsor Spardha)
3 – Shaunak Tamhane (Prize from Sponsor Spardha)
4 – Shubhan Tamhane (prize from CTMM EC)
5 – Rasshmi Sathe (prize from CTMM EC)Public Choice Awards 
Solo Performances (All prizes from CTMM EC)
1 – Arohi Vagga
2 – Arnav Malpure
3 – Kedar GodboleGroup Performances (Prize from sponsor Tawa)
1 – Tanvi / Ananya / Arya*Ad Challenge* (All prizes from sponsor Tawa)
1 – Zandu Balm
2 – Cadbury – Perk
3 – Pan Pasand
4 – Rasna (added by CTMM EC)In the coming days we will be in touch with the prize winners for sending out the prizesOnce more – congratulations to the prize winners and kudos to everyone who participated. Our 3 amazing judges (Madhura Deo, Swati Jogdand and Charu Pandit ) were completely blown away by the talent we saw on the 17th, and it was extremely tough for them and the EC to decide on the winners. Thank you also to all the audience members who voted at the event for talent show and the ad challenge!!🙏 (There were 170 of you!!)Thank you everyone for bringing your best to the event!🙏🙏 we hope to see you soon for our next program!

Sankrant 2021  – Saturday January 23rd