चंदेरी ते बनवाबनवी
आयुष्य म्हणजे काय? वर्तमानात जगून नवीन आठवणी तयार करणे .आयुष्यात अशी संधी मिळाली की तिचे सोने करणे आपल्या हातातअसते . अशी संधी आम्हा कनेक्टिकटची ५० –५५ हौशी कलाकारांनाआणि २५० प्रेक्षकांना मिळाली . इथे अमेरिकेत सातासमुद्रापार आपणसगळे भारतीय सण जोरदार साजरे करतो. त्यात जरका आपल्या मराठीसंस्कृतीचा सुगंध लाभला तर ह्या सगळ्या सोहोळ्याला वेगळाच रंग चढतो.
अमेरिकेतील सदाशिव पेठ म्हणता येईल अश्या आमच्या कनेटिकट राज्यात मराठी मंडळाने ह्या दिवाळीला लख लख चंदेरी ते अशी हिबनवाबनवी असा चित्रमय प्रवास साजरा केला आणि त्याबरोबरच पु ल , बाबूजी आणि गदिमा यांना आदरांजली वाहिली. नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रमCTMM दिवाळी धमाका मध्ये २० नोव्हेंबर ला न्यूविंगटन कनेक्टिकट येथे वल्लभधाम मंदिरात रंगला. गणपती मधील हास्ययात्रेच्या उत्तमप्रतिसादानंतर काय हा प्रश्न निर्माण झाला. गेल्या काही वर्षांपासून आमचाइथला एक संगीत ग्रुप चांगला जमला आहे . आम्ही सर्व कराओके वीरव्हाट्सएप्प ग्रुप वर गाणी पोस्ट करतो. एक रसगंधर्व नावाचा अल्बम पणयुट्युब वर टाकला आम्ही . आम्ही कधी कधी प्रत्यक्ष जमतो आणिगाणी गातो . ह्या मैफिलींमध्ये मध्ये गाण्याला थीम देण्याच्या आणिनिवेदन देण्याचा प्रकार मी दोन तीन वेळा केला . तेंव्हा ट्रेव्हिया देऊन आणिएका धाग्याला बांधून ठेवणारे असे निवेदन करत असे. त्यावेळा एक मोठाअल्फा TV वरील नक्षत्रांचे देणे असा कार्यक्रम करावा असे बेच वेळावाटत असे. . हा प्रस्ताव आमच्या EC समोर ठेवला आणि सहमती झाली . मग सुरु झाला ह्या लख लख चंदेरी CTMM दिवाळी धमाका चाप्रवास.
नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रम असेल तर पु ल , बाबूजी आणि गदिमा ही त्रिमूर्ती तर आठवणीत दत्त म्हणून उभी ठाकते . आणि नुकतीच ह्यांची जन्मशताब्दी साजरी झाली . ह्यांच्या व्यतिरिक्त आपल्या चित्रपटश्रुष्टीच्या तीन संस्था ज्यांना म्हणता येईल अश्या प्रभात, भालजी यांचाजयप्रभा स्टुडिओ (दादा आणि मंगेशकर सुद्धा) आणि लक्ष्या , अशोक , सचिन आणि महेश अशी चौकडी अश्या वेगवेगळ्या काळातल्या प्रेक्षकांनाखिळवून ठेवणाऱ्या संस्था यांना आदरांजली वाहू असे ठरवले.
नृत्य , गाणी आणि नाटक अश्या तीन माध्यमातून आम्ही आमचा कार्यक्रमसादर करणार होतो. म्हणून गाणी निवडणे , नाच असेलेले परफॉर्मन्सनिवडणे आणि नाट्यातून प्रस्तुत केलेले चित्रपट किंवा साहित्य असे तीनप्रकार निवडायचे होते. आमच्या प्रोग्रॅम ला वादक उपलब्ध नव्हते म्हणूनगाण्यांना कराओके ट्रॅक चा उपयोग करायचा असे ठरले .
कार्यक्रमाची सुरवात बाबूजी , पु ल आणि गदिमा यांच्या संयुक्त पणेकेलेल्या कलाकृतीतून व्हावी आणि त्यात कलाकृतीत वंदेमातरम असावं हायोग जुळवला. वेदमंत्रांहून आम्हा वंद्य वंदेमातरम हे गाणे ठरले. ते गाणे लहानग्या व्योम कडेगावकर ला येते असे त्याच्या बाबूजींचे फॅनअसलेल्या काडेगावकर दाम्पत्यांनी सांगितले . आणि छोट्या व्योम नी पहिल्याच बॉल वर षटकार ठोकला.
प्रभात म्हणले तर गाणी आलीच . लहान मुलांकडून सगळ्यात जुनी गाणीगेली गेली तर आपसूक एक व्वा फॅक्टर तयार होतो. प्रभात च्या गाण्यातलीदोन लहान मुलावर चित्रित झालेली गाणी म्हणजे दोन घडी चा डाव आणिमन शुद्ध तुझं . ही गाणी फार लोकप्रिय आहेत आणि मुलांना गायलायोग्य आहेत. अर्णव मालपुरे ने दोन घडीचा डाव आणि त्यातल्या शेवटच्याताना फार सुंदर रित्या घेतल्या. आयुष आणि आरुषी साबडे ह्या भावबहिणींनी मन शुद्ध तुझे घेतले. योगायोगाने मेरा गानावर दोन घडीचा डावचा कराओके ट्रॅक होता पण साबडे कुटुंबीयांनी तो त्यांचा भारतातीलवादक सभासदांकडून तयार करून घेतला.
प्रभात चे सगळ्यात लँडमार्क गाणे म्हणजे लख लख चंदेरी. त्यागाण्यावरचानाच दिवाळीला अतिशय समर्पक होणार होता . साऊथ विंड्सर चाकल्याणी पंडित यांचा चंदेरी डान्स ग्रुप ने हे शिवधनुष्य हाती घेतले. त्यांनी चित्रपट श्रुष्टीचे अभिमान गीत असलेले नवीन व्हर्जनवर डान्स बसवला. १५हुन अधिक महिला आणि १० हुन अधिक मुलांनी ह्यात भाग घेतला. प्रेक्षकांनाफार आवडला. त्यांनी २० एक दिवस जोरदार तयारी केली होती, एवढ्यालोकांनी जमणे आणि सराव करणे हा मोठा उपक्रम होता.
 पु लंच्या अफाट कामांपैकी काय आणि कसे नाट्यमयरित्या साजरे करायचेहा प्रश्न वैदेही परांजपे ह्यांच्या व्यक्ती अँड वल्लीस ह्या ग्रुप नि सोडवला. पुलंचे मी आणि माझा शत्रुपक्ष मधील नवीन घर दाखवणारा गृहस्तआणि फोटो दाखवणारे दाम्पत्य आणि स्वतः पु ल त्यांनी सुंदर रित्यारंगवले. सर्व विनोद आणि त्याचे बारकावे टिपले.
मागच्या वर्षी दिवाळी ऑनलाईन एक पात्री कार्यक्रमात जोत्स्ना कुरकुटे हिनेती फुलराणी मध्ये तुला शिकवीन चांगलाच धडा सादर केला होता. त्यावेळीपु लआजच्या सोशल मीडिया च्या काळात असते तर त्यांनी हाच प्रवेशकसा लिहिला असता ह्याचा विचार करून मी ती स्क्रिप्ट लिहिली होती. तीBMM उत्तररंग च्या कार्यक्रमाला सादर करावी असा प्लॅन होता पण काहीकारणांनी तेंव्हा जमले नव्हते. पण ते आता प्रत्यक्ष स्टेज वर सादर करायचेअसे ठरले. जोत्स्ना हे प्रचंड एनर्जी ने सादर करतात आणि एवढा मोठामोनोलॉग पहिला विसरून दूसरा पाठ करायचा हे अवघड होते. ते त्यांनीअफाटरित्या सादर केले.
बाबुजी आणि गदिमा यांचे गीत रामायण हा मराठी साहित्य आणि संगीतह्यांचा आत्मा आहेत. त्यात जरका नृत्य सादर केले तर तो तिय्या पूर्ण होईलआहि कल्पना बऱ्याच वेळा सादर झाली आहे. ती आपण पण करावी असेठरले. त्याले सगळ्यात योग्य असे स्वयंवर झाले सीतेचे हे गाणे नृत्यस्वरूपात वैदेही परांजपे आणि त्यांचा यंग स्टोरी टेलर्स ग्रुप यांनी सुंदररित्या सादर केले.
सुधीर फडके यांचे एक धागा सुखाचा हे गाणे बाबुजीचा फॅन असलेला हेमंतकाडेगावकर याने सादर केले . आशा ताई आणि बाबूजींची अनेक युगुलगीते लोकप्रिय आहेत त्यातील चंद्र आहे साक्षीला हे गाणे मी स्वतः आणिलीना दामले ह्यांनी सादर केले.
मग आम्ही चित्रपट श्रुष्टि कडे वळलो . भालजींचे योगदान फार मोठे आहे. भालजींची गाणी मला खूप सुंदर वाटतात . याला कारण म्हणजेमंगेशकरांचा संगीत. भालजींच्या फिल्म इन्स्टिट्यूशन मधून दादाकोंडकेंसारखे कलाकार तयार झाले. अखेरचा हा तुला दंडवत मधील दारीदरीतील देवाचे दर्शन करून आलेल्या मावळ मनाला हे गाणे फारहृदयस्पर्शी वाटते. ते गाणे अंजली साबडे ह्यांनी सुरेख रित्या साजरे केले.नवीन लोकांकरिता एक रीमिक्स पण घ्यावे असे ठरवले . ते म्हंजे अवधूतगुपचे बाई बाई मनमोराचा . ते गाणे मुकुंद आवटी सारख्या ग्रुप मध्ये लोकप्रिय कलाकाराला द्यावे असे ठरवले. दादांवर चित्रित दोन गाणी घ्यावीअसे ठरवले. एक युगल गीत जे टिपिकल दादा असे म्हणता येईल म्हंजेमाळ्याच्या मळ्यामधे . ते अंजली आणि मुकुंद यांनी मजेशीर रित्या गेटअपमध्ये सादर केले. मिनार मुजुमदार यांनी ‘डोल मोराचा मानेचा हे सुरेख रित्यासादर केले.
गदिमा यांचे भाषाप्रभुत्व म्हणून माहेर हि कविता काव्यवाचनातून निवेदिकाअसलेल्या शिल्पा कुलकर्णी आणि वेदवती कडेगावकर सादर केली. वॉटर सायकल ह्या विषयावर भाववविश्व व्यापून टाकणारी कविता फारअफलातून आहे. हान्स अँडरसन च्या अग्ली डकलिंग ह्यावर ग दि मां नी एका तळ्यात होती हे गाणे लिहिले आहे. ते मधुरा राव ह्यांनी गायले .बाबूजींनी अजरामर लावण्या लिहिल्या. डान्स ला योग्य अश्या बुगडी माझीआणि उसाला लागेल कोल्हा ह्या लावण्या वैभवी पंडित ह्यांच्या लावणीलावण्यवतीस ह्या ग्रुप ने धमाकेदार लावण्या नृत्यातून सादर केल्या .
सगळ्यात शेवटी अशोक लक्ष्या महेश आणि सचिन ह्या चौकडी ह्यांचे कामनाटकातून दाखवायचे ही किमया अमेय टुमणे ह्यांच्या नटरंगस ग्रुप ह्यांनीकेले . ह्या नाटकात मी स्वतः काम पण केले. आम्ही अशी हि बनवाबनवीह्या सगळ्यात गाजलेल्या सिनेमाचे २०–२५ मिनिटात सगळे आयकॉनिकसीन्स असलेली नाटुकली केली. सुधीर जोशी ह्यांची भूमिका रंगमंचावरकरायचे माझे स्वप्न पूर्ण झाले. अमेय टुमणे ह्यांचा लक्ष्या आणि केदारकुलकर्णी ह्यांचा सचिन आणि स्त्रीवेषात त्यांनी केलेली धमाल प्रेक्षकांच्याखूप लक्ष्यात राहिली. मुकुंद आवटी ह्याचा अशोक आणि जोत्स्नाकुरकुटे हिची अश्विनी भावे उत्तम झाली . अभिजात आणि वीणा वग्गा यांनी सिद्धार्थ आणि निवेदिता ह्यांच्या भूमिका चोख पार पाडल्या . वर्षदेशमुख ह्यांनी सुप्रिया आणि अश्विनी जोशी यांनी भावना यांचे कामकेले. वर्षां यांनी हृदयी वसंत, कुणीतरी येणार हा डोहाळजेवणाचा धम्मालडान्स आणि बनवाबनवी चे थीम सॉन्ग या सगळ्यावर कोरिओग्राफी उत्तमरित्या बसवली . अमेय ह्यांचे स्क्रिप्ट लेखन आणि दिग्दर्शन खुमासदार होते.नाटकांच्या तालमीत सगळ्यांनी खूप धम्माल केली .
ह्या सगळ्याची शेवट ने मजसी ला बाबूजी आणि हृदयनाथ ह्यांनीदिलेल्या चालींचा संगम करून व्हावी असे वाटले. पहिल्या अंतऱ्यातलेकारुण्य आणि शेवटच्या अंतऱ्यातले शौर्य हे उठणं दिसले असते असे वाटले.हे अवघड काम लीना दामले यांनी केले. त्यांना सर्व कलाकारांनी साथ दिलीआणि ह्या नक्षत्राचे देणे कार्यक्रमाची हृदयस्पर्शी सांगता केली
ध्वनी यतीन राव यांनी, दृश्य चित्रे प्रफुल कुलकर्णी यांनी सांभाळले.नियोजनात हेमंत काडेगावकर यांनी मदत केली. निवेदन मी स्वतः, शिल्पाकुलकर्णी आणि वेदवती कडेगावकर यांनी केले. व्यवस्थापनात CTMM EC चे राधिका परमानंद, किरण परांजपे , वैभवी पंडित, माधवी कानेटकरआणि वृषाली धारकर सोबत होतेच
ह्या कार्यक्रमात किल्ले आणि रांगोळी स्पर्धांचा बक्षीस समारंभ आणि लहान मुलांनी केलेली मल्लखांब प्रात्यक्षिके पण साजरी झाली. मराठमोळेजेवण आणि मराठी दांडिया यांचा आनंद पण उपस्थित मराठी लोकांनीघेतला.
२५० च्या आसपास संख्येने ने असलेल्या उपथित प्रेक्षकांनी आणि ५०हुन अधिक कलाकारांनी प्रस्तुतीकरणात खूप आनंद साजरा केला. ही दिवाळी सगळ्यांना खूप स्मरणात राहील.
|