CTMM Membership Drive. Sign up for a nominal fee to get all the benefits!!
नमस्कार मंडळी! आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत CTMM च्या वार्षिक सभासदत्वाचे निवेदन. गेले २ वर्षे COVID-१९ सारख्या जागतिक महामारी मुळे CTMM चे काही कार्यक्रम एकतर झाले नाहीत किंवा ऑनलाईन झाले. त्यामुळेच ही २ वर्षे CTMM चे वार्षिक सभासदत्व सुद्धा विनामुल्य होते. देवाच्या कृपेने, आणि हो वैद्यकीय संशोधनामुळे सुद्धा, हे संकट आता टळल्यातच जमा आहे आणि म्हणूनच आपल्याला आता in-person कार्यक्रमांचे आयोजन आणि काही मुलभूत खर्च (Insurance, Emails, Website, BMM Membership ई.) ह्यासाठी निधी जमा करणे आवश्यक आहे. २ वर्षानंतर आलेला हा बदल फार जाणवू नये म्हणून सभासदत्वाचे शुल्क खूपच नाममात्र ठेवण्यात आले आहे. सध्या चालू असलेली महागाई लक्षात घेता हे शुल्क पुरेसे होईल की नाही याची खात्री आम्हाला पण नाहीये, पण आम्ही आमच्या वतीने ह्या निधीचा अगदी विचारपूर्वक वापर करू. सभासदत्वाच्या अनुषंगाने मिळणारे काही फायदेही आम्ही खाली नमूद केले आहेत. कार्यकारिणी समिती तर्फे आपणा सर्वांना विनम्र विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने आपण CTMM चे सभासदत्व घेऊन आपल्या ह्या मंडळाची वाटचाल कायम ठेवण्यास हातभार लावावा. आपणापैकी कोणाला CTMM साठी उत्स्फूर्त देणगी द्यायची असेल तर तसेही जरूर कळवा ctmmkarya@gmail.com ला ई-मेल पाठवून. आपणा सर्वांच्या सहकार्याची नितांत गरज आहे आणि ते हमखास मिळेल अशी खात्री बाळगून आहोत.
आपले विनम्र ,
कार्यकारिणी समिती कनेटिकट महाराष्ट्र मंडळ